Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खामगावात कलाशिक्षकांने कुमुदिनी रोपण करत साजरा केला प्रजासत्ताक दिन

खामगाव, प्रतिनिधी | प्रत्येकाला काहीना काही छंद असला तो जोपासण्यासाठी ती व्यक्ती नेहमीच तत्पर असते. अशाच प्रकारे खामगाव येथील कलाशिक्षक संजय गुरव यांनी आपला कुमुदिनी रोपणाचा छंद पूर्ण करत प्रजासत्ताक दिन साजरा केला.

 

कलाशिक्षक संजय गुरव यांनी सारोळा शिवारातील बोर्डी नदीच्या पात्रात कुमुदिनी रोपण (वाॅटर लिली) लागवड करून प्रजासत्ताक दिन साजरा केला.  श्री. गुरव यांच्या लोटस टेरेस गार्डन बघण्या करिता आलेला वृषभ,सानिका व संचिता पांडुरंग मिसाळ या भावंडांना आपल्या शेतात लगतच्या नदीवर कुमुदिनी रोपण करण्याची इच्छा संजय गुरव यांच्याकडे प्रगट केली असत त्याची लागवड करण्यात आली. या नदीवर तीन ते चार कोल्हापूरी बांध असल्यामुळे बारमाही महीने पाणी असते आणि या नदी परिसरातील संपूर्ण शेती बागाईत असल्यामुळे भविष्यात येथील शेतकरी बांधवांना या कुमुदिनी रोपणाचा नक्कीच बीज परागीकरणास फायदा होईल .या सोबतच भारतीय कमळाचे रोपण व लागवड या प्रसंगी करण्यात आले. या कार्यात कमळप्रेमी गौरव इंगळे, तेजस भुंबरे, किशोर भागवत, पांडुरंग मिसळ, प्रकाश आहिरे, वीरेन्द शहा आदींची उपस्थिती लाभली.

Exit mobile version