Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खान्देश वहीगायन लोककला संमेलनाचे जळगावत आयोजन – विनोद ढगे (व्हिडिओ)(व्हिडिओ

जळगाव, प्रतिनिधी |  खान्देशातील लोककलावंच्या न्याय हक्कासाठी सरकार ला जागे करण्यासाठी खान्देशातील पहिले वहीगायन लोककला संमेलन १६ जानेवारी २०२२ रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष विनोद ढगे यांनी दिली. ते संमेलनाच्या आयोजना संदर्भाच्या आयोजित बैठकीनंतर प्रसारमाध्यमांसी बोलत होते.

 

 

खान्देशात मागील पन्नास वर्षात वहीगायन कलावंत प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने संघटीत झाला असुन … याच संघटीत शक्तीच्या बळावर… वहीगायन लोककलेला राज्यमान्यता मिळावी परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष विनोद ढगे यांनी अपेक्षा व्यक्त केली.  त्यांनी पुढे सांगितले की,  खान्देशातील सर्व लोककला प्रकारातील लोककलावंताची मध्यवर्ती संघटना म्हणून “खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठाना ची स्थापना करण्यात आली आहे.  याच प्रतिष्ठाना अंतर्गत “खान्देश वहीगायन लोककला परिषदेची निर्मिती करण्यात आली आहे.  या परिषदेच्या माध्यमातून खान्देशातील वहीगायन लोककलावंताची संघटनात्मक बांधनी करण्यात आली आहे. यासाठी खान्देश लोककलावंत संवाद यात्रा द्वारे वहीगायन कलावंताची विविध तालुक्यात तालुका स्तरावर कलावंत मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे आहे. खान्देशात प्रथमच या संमेलनाचे आयोजन होत असून  दि १६  जानेवारी २०२२ रोजी जळगाव येथील बाल गंधर्व खुले नाट्यगृह येथे हे एक दिवसीय संमेलन आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.  जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असुन या संमेलनासाठी विविध समित्यांच गठन यावेळी करण्यात आले.  या संमेलनासाठी जैन उद्योग समुहाचे अशोक जैन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.  आजच्या बैठकीत वहीगायन परिषदेचे जळगाव जिल्हा सह बुलढाणा, सोयगाव, ब-हाणपूर येथील मोठ्या संख्येने तालुका प्रमुख उपस्थितीत होते.

 

 

Exit mobile version