Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोरोना काळात महाराष्ट्र शासनाकडून एकल लोककलावंताना मदत जाहीर करण्यात आली होती. शासनाचे आदेश असतांना पाचोरा तालुका वगळता इतर कोणत्याही तालुका प्रशानाकडून लोककलावंताचे अर्ज स्विकारण्यात न आल्याने बुधवारी ७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. लोककलावंत यांना न्याय देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात लोककलावंतांना शासनाकडून कोविड पॅकेज जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार एकल लोककलावंतांना २२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज सादर करण्याची जाहीरात एका वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या जाहिरातीनुसार जळगाव जिल्ह्यातील एकल लोककलावंतांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अर्ज दाखल केला होता. दरम्यान या संदर्भात शासनाचे आदेश देखील आहे. जळगाव तालुक्यातील १४ तालुक्यांपैकी पाचोरा तहसील कार्यालय वगळता इतर १४ ठिकाणच्या तालुका प्रशासनाने एकल कलावंतांकडून अर्ज स्वीकारण्यात आलेले नाही. प्रशासनाच्या या असंवेदनशिल कारभारामुळे जिल्ह्यातील ५०० एकल कलावंत कोविड अर्थसाह्य योजनेपासून वंचित राहत आहे. कलावंत अर्थसाह्य योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना मंत्रालयाकडून जिल्हाधिकारी यांना पत्राधारक कळविण्यात आले असतांना जिल्हा प्रशासनाकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील लोककलावंतांच्या अर्ज स्वीकारण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येऊन योजनेचा लाभ कलावंतांना मिळवून द्यावा अन्यथा जिल्ह्यातील एकल लोककलावंत एकदिवसीय धरणे आंदोलन करतील, असा इशारा खानदेश लोककलावंत विकास परिषदे अध्यक्ष विनोद ढगे यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिले आहे.

 

 

Exit mobile version