खान्देशातील वहीगायन लोककलेच्या संवर्धनासाठी शासनाने धोरण निश्चित करावे

रावेर, प्रतिनिधी | खान्देशातील परंपरागत चालत आलेली खान्देशी मातीतील अस्सल लोककला वहीगायन या लोककलेला शासनाने त्वरीत राज मान्यता द्यावी व  खान्देशातील  वहीगायन लोककले सोबतच खान्देशातील इतर सर्व लोककलेच्या जतन व संवर्धना साठी शासनाने खान्देशा साठी स्वतंत्र सांस्कृतिक धोरण त्वरीत निर्माण करावे अशी मागणी खान्देश लोककलावंत विकास परिषद चे अध्यक्ष विनोद ढगे यांनी रावेर येथे आयोजित तालुकास्तरीय वहीगायन मेळाव्यात केले

 

खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या वतीने रावेर येथील माळीवाडा येथे तालुकास्तरीय वहीगायन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घाटन विनोद ढगे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाघोड चे जेष्ट वहीगायन कलावंत शाहीर रघुनाथदादा मोपारी होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रावेर चे माजी नगराध्यक्ष गोटूशेट महाजन शिवसेना नेते प्रल्हादभाऊ महाजन, भाजपचे नेते पदमाकर महाजन, उमेश महाजन उपस्थित होते. खान्देशातील सर्वच लोककला प्रकारातील लोककलावंताच्या न्याय व हक्का साठी खान्देश परिषदेच्या माध्यमातून लढा उभारण्यात आला असून वहीगायन लोककलेच्या संवर्धनासाठी खान्देशातील लोककलावंत संघटीत झाला आहे. या मेळाव्यात खान्देश लोककलावंत विकास परिषद रावेर तालुकाअध्यक्षपदी गणेश महाजन यांची निवड करण्यात आली. या मेळाव्यासाठी रावेर तालुक्यातील दोनशे वहीगायन लोककलावंत सहभागी झाले होते

Protected Content