Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खान्देशातील लोककलेच्या संवर्धनासाठी व लोककलावंताच्या न्यायहक्कांसाठी कटिबद्ध – अॅड. रोहीणीताई खडसे

मुक्ताईनगर, प्रतिनिधी | खान्देशातील मुळ लोककला वहीगायन या लोककलेसोबतच खान्देशातील पुर्वपांर चालत आलेल्या सर्वच लोककलेच्या संवर्धनासाठी व लोककलावंताच्या न्यायहक्कांसाठी आपण कटिबद्ध आहोत व यासाठी शासन स्तरावरून प्रभावी रित्या पाठपुरावा करण्यासाठी मी खान्देश लोककलावंत परीषदेच्या पाठीशी खंबीर उभी राहील असे प्रतिपादन अॅड. रोहीणीताई खडसे यांनी हरताळा येथे आयोजित मुक्ताईनगर तालुकास्तरीय वहीगायन मेळाव्यात केले

 

 

खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या वतीने मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथे तालुकास्तरीय वहीगायन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घाटन अँड रोहीणीताई यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे  होते. खान्देश लोककलावंत परिषदेच्या वतीने खान्देशातील वहीगायन लोककलेस खान्देशी लोकककला म्हणून व शासन दरबारी त्याची नोंद करून शासन मान्यता द्यावी तसेच खान्देशातील सर्व लोककलेच्या संवर्धनासाठी शासनाने खान्देशासाठी स्वतंत्र सांस्कृतिक धोरण निर्माण करून त्या साठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावे अशी अग्रही मागणी परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी या मेळाव्या प्रसंगी केली. खान्देश लोककलावंत परिषदेच्या वतीने केलेल्या सर्व मागण्याचा पाठपुरावा माझ्या कडून शासनस्तरावर प्रभावीरित्या करण्यात असे आश्वासन याप्रसंगी अॅड. रोहीणीताई खडसे यांनी केले.  याप्रसंगी खान्देश परिषदेच्या मुक्ताईनगर तालुका कार्याध्यक्षपदी जेष्ठ वहीगायन कलावंत किसन आबा चव्हाण यांची तर तालुकाअध्यक्ष पदी संतोष भाऊ ठाकुर यांची निवड करण्यात आली. या मेळाव्यात मुक्ताईनगर तालुक्यातील २५० वहीगायन लोककलावंत उपस्थित होते.

Exit mobile version