Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खाद्यतेलांच्या किमती भिडल्या गगनाला

जळगाव, लाइव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला ४० ते ४५ दिवस उलटले आहेत. अजूनही युध्द थांबण्याची चिन्हे दिसून येत नाहीत. मात्र या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तेल दरवाढीवर कायम आहे. फेब्रुवारी-मार्च दरम्यान काहीसे स्थिरावलेले तेलाचे दर पुन्हा वाढत असल्याचे संकेत आहेत. संसर्ग काळात खाद्यतेलाचे काहीसे वाढलेले दर या युद्धामुळे पुन्हा गगनाला भिडले आहेत. स्थानिक बाजारपेठेत खाद्यतेलाच्या दरात किमान दीड ते दोन पट वाढ झाली असून सर्वसामान्याच्या खिशाला कात्री लागली आहे.

भारतात कृषी क्षेत्राला आवश्यक रासायनिक खतांसह अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर परिमाण झाला आहे. खाद्य तेलांच्या देखील किमतीत दरवाढ झाली आहे. दरवाढीमुळे उत्तरेकडील पाच राज्ये वगळून देशभरात १ फेब्रुवारीपासून खाद्यतेल तसेच तेलबियांच्या साठय़ावर मर्यादा होती. १ एप्रिलपासून खाद्यतेलसाठा मर्यादेच्या कक्षेत आणण्यात आली आहेत, मात्र त्यामुळेही दरवाढीवर नियंत्रण लागण्याची चिन्हे नाहीत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील आणि विशेषत: युक्रेनमधील युद्धाचा परिणाम तेल दरवाढीवर अजूनही कायम आहे. साठा मर्यादेत तेलबिया, तेल आणल्यानंतर दर कमी होण्याची शक्यता अजिबात नसून आंतरराष्ट्रीय घडामोडींचा तेलाच्या आवकवर परिणाम झाला आहे. भारतात दरवर्षी १५० ते १६० लाख टन तेल आयात होते, यात दरवर्षी ७० ते ८० लाख टन पामतेलाच समावेश आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल तेलाची आयात कमी झाली असून एकटय़ा युक्रेनमधून ७० टक्के सूर्यफूल तेलाची आयात केली जाते. हवामान बदलामुळे यावर्षी सोयाबीनची लागवड कमी असल्याने सोयाबीन तेलाची आवक कमी झाली असून स्थानिक बाजारपेठेत देखील खाद्यतेलाचे दर गेल्या दोन अडीच महिन्यात दुप्पट झाले आहेत. पूर्वी सोयाबीन तेल ९०० एमएल चे पाऊच ७० रुपये होते, ते संसर्ग काळात ८० ते ११० दरम्यान पोचले होते. परंतु आता डिसेंबर नंतर हेच सोयाबीन पाऊच १५० ते १६० रुपये पर्यत आहे. तर १५ लिटर तेलाच्या डब्याची किमत सूर्यफूल २५५० ते २७००, पामतेल २२०० ते २४००, शेंगदाणा २६५० ते २७५०, सोयाबीन तेल २३०० ते २४०० रुपये दरम्यान आहे.

Exit mobile version