Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खाटीक समाजाच्‍या सामूहिक विवाह सोहळ्यात ४६ जोडपी विवाहबद्ध

bhusawal2 1

भुसावळ प्रतिनिधी । येथील खाटीक बिरादरी यंग ग्रुपतर्फे खडका रोडवरील ईदगाह मैदानावर २५ फेब्रुवारी रोजी सामूहिक विवाह सोहळ्यात ४६ जोडपे विवाहबध्द झालेत.

या मेळाव्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशातील सुमारे १५ हजारांपेक्षा जास्‍त वर्‍हाडी उपस्थित होते. नव-दाम्पत्यांना आयोजकांतर्फे कुराणाची प्रत भेट देण्यात आली व वर्‍हाडींसाठी आयोजकांनी जेवणाचीही व्यवस्था केली होती. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र अध्यक्ष एल.ए.शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुस्लीम खाटीक समाजातील प्रौढ व यंग ग्रूप यांनी एकत्र येत सामूहिक विवाहाबाबत प्रस्ताव मांडल्यानंतर समाजातील मान्यवरांनी त्यास होकार दर्शवल्यानंतर समाजातर्फे पैसा एकत्र करून हा सोहळा पार पडला.४६ जोडप्यांना विवाहबद्ध करण्यासाठी हाफिज कमरुद्दीन, हाफीज सुलतान, हाफीज अलीमोदिन,हाफीज सद्‍दाम, हाफीज अब्दुल हकीम,हाफीज रफिक पटेल, मुक्ती जावेद, मौलाना अनिस,कारी जहीर,मो. जुबेर यांनी निकाहनामा पठण केला. यंग ग्रुप तर्फे वाहतूक व्यवस्‍था,जेवणावळी,टेंट, बिछाईत,पाण्याची व्यवस्था करण्यात आली. यशस्वीतेसाठी भुसावळ खाटीक बिरादरी यंग ग्रुपच्या सर्व पदाधिकारी सदर्‍यांनी परीश्रम घेतले.

Exit mobile version