खाजने बोगद्यात भींतीचा भाग कोसळला ; कोकण रेल्वे ठप्प

पणजी (वृत्तसंस्था) पेडणेनजीक खाजने बोगद्यात भींतीचा काही भाग कोसळल्याने कोकण रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. गोवामार्गे येणाऱ्या जाणाऱ्या अनेक रेलगाड्या लोंढामार्गे वळविण्यात आलेल्या आहेत.

 

बोगद्यात दरड कोसळल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या २४ तासात अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका हा कोकण रेल्वेला बसला आहे. मुसळधार पावसाने दरड कोसळली आहे. पेडणे बोगद्यातील संरक्षक भिंत कोसळल्याने मातीचा ढिगारा रेल्वे रुळावर आला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला आहे. कोकण रेल्वेची ठप्प झालेली वाहतूक पनवेल-पुणे-मिरज- लोंडा- मडगाव मार्गे आणि मडगाव-लोंडा-मिरज-पुणे-पनवेल-कल्याण मार्गे वळविण्यात आली आहे. तर रुळावरील माती, दगड हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

Protected Content