Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खळबळजनक : पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये तरुणीचा विनयभंग !


पनवेल (वृत्तसंस्था)
पनवेलमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये एका तरुणीचा २५ वर्षीय युवकाने गुरुवारी मध्यरात्री विनयभंग केल्याचा प्रकार घडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या निमित्ताने क्वारंटाईन सेंटरमधील महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशयितांना किंवा कोरोना बाधित रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था कोण गाव येथील इंडिया बुल्स येथे करण्यात आली आहे. याठिकाणी पिडीत तरुणी आणि तिच्याच परिसरात राहणारा एक युवक क्वारंटाईन करण्यात आले होते. गुरूवारी मध्यरात्री विकृत युवकाने विचित्र पद्धतीने तरुणीचा विनयभंग केला. पीडित तरुणीनीने मुलाने तिचा विनयभंग करून तिच्या गुप्तांगात बोटे घातल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनाी याबाबत तत्काळ कारवाई करत भा. दं. वि. कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर क्वारंटाईन सेंटरमधील महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Exit mobile version