Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खळबळजनक : धरणगाव तालुक्यातील तीन कोरोना बाधितांचा मृत्यू !

 

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढतच आहे. आज सकाळी तालुक्यात तब्बल १० रुग्ण आढळून आले. तर दुसरीकडे बुधवारी रात्री धरणगाव शहरातील दोन तर नांदेड येथील एका कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

शहरातील तीन कोरोना बाधितांवर जळगाव आणि नाशिक येथे उपचार सुरु होते. यातील मराठे गल्ली येथील रुग्णाचा नाशिक येथील रुग्णालयात बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान, मृत्यू झाला. घाटोळ अलीमधील महिलेचा बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तर नांदेड रुग्णाचा मंगळवारी मध्यरात्री जळगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे. आज सकाळी आलेल्या रिपोर्टनुसार धरणगाव तालुक्यात पुन्हा १० नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत. त्यानुसार एकूण रुग्ण संख्या १७७ इतकी झाली आहे. यातील १६ जण मयत झालेत आहेत. तसेच आतापर्यंत १०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजरोजी कोविड सेंटरला ५७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ३८ संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत.

Exit mobile version