Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खळबळजनक : कोविड सेंटरमध्येच कोरोनाबाधित रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या


पुणे (वृत्तसंस्था) पु
ण्यातील येवलेवाडी येथील कोविड सेंटरमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गुंडाप्पा शरणाप्पा शिवरे (वय -५५, रा.अप्पर इंदिरानगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

 

अप्पर इंदिरानगर भागातील गुंडाप्पा शरणाप्पा शिवरे आणि त्यांचा मुलगा हे दोघे कोरोनाबाधित असल्याचा रिपोर्ट ४ जुलै रोजी आला होता. त्यानंतर या दोघांना येवलेवाडी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. ते दोघे एकाच खोलीत राहत होते. त्यांच्यासोबत त्या खोलीत आणखी दोन रुग्ण राहत होते. आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास गुंडाप्पा यांचा मुलगा आणि इतरजण नाष्टा करण्यासाठी बाहेर गेले असता. गुंडाप्पा यांनी खोलीतील लोखंडी पाईपला गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, तणावातून गुंडाप्पा यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे.

Exit mobile version