Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खर्ची येथील घरकुलाच्या यादीत मोठ्या प्रमाणात घोळ; चौकशीची मागणी (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील खर्ची खुर्द येथील घरकुल यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून याची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एरंडोल तालुक्यातील खर्ची खुर्द १५६  घरकुल लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये 121 जनांच्या नावाची घरकुल यादी तयार करण्यात आले. घरकुल याची ही खुर्द ग्रामपंचायत मध्ये वाचन न करता परस्पर ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या घेऊन ती पंचायत समिती एरंडोल येथे दाखल केली होती. त्यानंतर नव्याने दुसरी यादीत ७ जणांचे नाव घोषित केले. यामध्ये देखील गरजू लाभार्थ्यांचे नाव दिसून आले नाही. यासंदर्भात एरंडोल पंचायत समितीला चौकशीचे मागणी केली होती. त्यानुसार चौकशी अहवाल प्राप्त झालेला आहे. परंतु ज्या पद्धतीने अहवाल प्राप्त झाला त्या अहवालानुसार अधिकारी कारवाई अथवा चौकशी न करता दुर्लक्ष केले जात आहे. खर्ची खुर्द येथील घरकुल यादीत मोठ्या प्रमाणवर घोटाळा झालेला असून त्याची नि:पक्षपणे चौकशी करावी आणि गरजू लाभार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या घरकुल योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळावा यासाठी ही योजना सुरू केली. परंतु स्थानिक प्रशासनाकडून चुकीच्या पध्दीतीने अंमलबजावणी होत असल्याने गरजूंना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. दरम्यान प्रशासनाने आयपी कोडच्या माध्यमातून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देखील यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनावर दिलीप मराठे, अजितसिंग पाटील, चंद्रजित पाटील, मंगल भिल, किशोर पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Exit mobile version