Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडसेंच्या प्रवेशाचे मुहूर्त रोज सांगितले जात आहेत : फडणवीस यांचा टोला

 

उस्मानाबाद वृत्तसंस्था । भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांची मुहूर्त दररोज सांगितले जात असल्याचा टोला मारत देवेंद्र फडणवीस यांनी आपण या प्रकरणी कोणतेही भाष्य करणार असल्याचे आज स्पष्ट केले आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद येथे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश याबाबत त्यांना विचारले असता फडणवीस म्हणाले की खडसे यांच्या पक्ष प्रवेशाला चे मुहूर्त दररोज सांगितले जात आहेत. असे असले तरी आपण या प्रकरणी कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करणार नसल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

Exit mobile version