Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडका येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून अपहरण करणाऱ्यास अटक

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील खडका गावातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरणी करणाऱ्या संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. मात्र या कृत्यास मदत करणाऱ्या दुसरा संशयित फरार झाला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील खडका गावातील गणेश कॉलनी परीसरातील राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे ५ सप्टेंबर २०२० रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.‍ फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगीस तालुक्यातील साकरी येथील सराईत गुन्हेगार अमोल तुळशीराम भोळे याने फुस लावून शिवीगाळ व मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार दिली. यासंदर्भात अल्पवयीन मुलीच्या पालकांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली. न्याय न मिळाल्यास अल्पवयीन मुलीचे आई-वडिलांसह नातेवाईक तक्रार हे २ ऑक्टोंबर रोजी तालुका पोलीस ठाण्यासमोर ठिय्या करणार असल्याचे नमूद केले. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी अर्जाची दखल घेत पोलीस निरीक्षक यांना आदेश देत संशयित आरोपीस शोधण्यासाठी पथक पुण्यातील चाकण येथे रवाना झाले. आणि संशयित आरोपी अमोल भोळे याला ताब्यात घेत अल्पवयीन मुलीला घरी आणले. याप्रकरणी पुढील कारवाई भुसावळ तालुका पोलीस ठाणे करीत आहे

Exit mobile version