Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडका गावातील कंटेनमेंट झोन सील

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील खडका येथील महिला कोरोना पॉझिटीव्ह ठरल्याचे वृत्त आल्यानंतर या महिलेचा रहिवास असणारा परिसर रात्रीच सील करण्यात आला आहे.

भुसावळ शहरात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतांना आता खडका येथील महिलेस याचा संसर्ग झाल्याने हा विषाणू ग्रामीण भागातही पसरल्याचे दिसून येत आहे. खडका गावातील महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर तिचा रहिवास असणारा परिसर हा कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येऊन तातडीने सील करण्यात आला. या भागात अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता कुणालाही घराबाहेर पडण्याची बंदी लादण्यात आलेली आहे. तर या महिलेच्या घरातील तीन जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब सँपल तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आलेली आहे. तर या महिलेच्या संपर्कात नेमके किती जण आलेले आहेत याची खातरजमा करून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आलेले आहे.

Exit mobile version