Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडकदेवळा येथील ग्रामस्थाचे आमरण उपोषण

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथे स्थानिक विकास योजने अंतर्गत बांधण्यात आलेले प्रवाशी शेड हे गावातीलच काही मंडळींच्या सांगण्यावरुन व आर्थिक लाभासाठी तोडण्यात आल्याने प्रवाशी शेड नसल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांचे होत आहे. आहे त्या ठिकाणी प्रवाशी शेड तात्काळ बांधण्यात यावे, या मागणीसाठी अजय साहेबराव पाटील, रविंद्र लक्ष्मीकांत सोनवणे रा. खडकदेवळा बु” ता. पाचोरा व डोंगरगाव येथील ग्रामस्थ आज दि. २ ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

याबाबत अधिक माहित अशी की, पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे पाचोरा गोंदेगांव रस्त्यावर स्थानिक विकास‌ निधी अंतर्गत प्रवासी शेड हे बांधण्यात आलेले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने १८ मे २०२२ रोजी अतिक्रमण हटाव‌ मोहीमेअंर्गत प्रवाशी शेड तोडुन टाकले. त्यामुळे शासनाच्या निधीचा दुरूपयोग झालेला आहे. व तो निधी वाया गेलेला आहे. सदरचे प्रवाशी शेड हे सुनिल युवराज पाटील, अनिल विश्राम पाटील व दिलीप वाघ यांच्या सांगण्यावरून आर्थिक गैरव्यवहार करून काही एक तक्रार नसतांना ते तोडुन टाकलेले आहे.‌ सदरचे बस स्टॅण्ड तोडून टाकल्याने प्रवाशी तसेच शाळेत जाणारे विदयार्थी यांना थांबण्यासाठी व सावलीसाठी निवारा नाही. सध्या पाणी पावसाचे दिवस आहेत. परिसरातील विदयार्थी शाळेत ये – जा करतात, पावसामुळे कामे नसल्यामुळे उन पाणी व वारा यात उघडयावर थांबावे लागते त्यामुळे गैरसोय झालेली आहे. म्हणुन पुनच्छ त्याच जागेवर प्रवासी निवारा बनविण्यात यावा यासंदर्भात वारंवार संबंधित विभागाकडे अर्ज करुन देखील कुठलीच कारवाई होत नसल्याने अजय साहेबराव पाटील, रविंद्र लक्ष्मीकांत सोनवणे सह खडकदेवळा व डोंगरगाव येथील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.

Exit mobile version