Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खचणाऱ्या डोंगराने चिंतीत हरताळे ग्रामस्थांची संरक्षण भिंत बांधण्याची मागणी(व्हिडिओ)

हरताळे, ता. मुक्ताईनगर, प्रतिनिधी  ।  मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. हा डोंगर पावसाळ्याच्या दिवसात ढासळत असून त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. 

 

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे गाव पुर्वापार डोंगराजवळ वसलेले आहे. डोंगराच्या पायथ्याशी मोठी वस्ती आहे. त्या वस्तीजवळ असलेल्या डोंगर पावसाळ्याच्या दिवसात ढासळत असून डोंगराचे पाणी घरामध्ये शिरते. पावसाळ्यात डोंगराच्या भागाखाली राहणाऱ्या ग्रामस्थांच्या घरापर्यंत दगड-माती खचून घरावर पडत असल्याने डोंगराचे पाणी भिंतीमध्ये मुरते. कोकणातील तळी येथे घडलेल्या घटनेमुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी डोंगराखाली राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून डोंगराच्या पायथ्याशी वस्ती असलेले हे गाव आहे याठिकाणी दगडमाती ढासळत असते २०  ते २५  फुट उंच डोंगराच्या पायथ्याशी नागरीवस्ती असल्याने त्याठिकाणी मोठी दरी आहे. तेथूनच वरच्या बाजूला देखील वस्ती आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथील जाणकारांनी या वस्तीला दगडांमध्ये भिंत बांधून आडोसा करून गैरसोय दूर केली होती. काहींनी त्याची आठवण करून दिली तर काहींना माळीन गावा सारख्या भूस्खलनाची आठवण झाली. येथील वस्तीतील लोकांना ये जा करतांना मोठी कसरत करावी लागते. त्यासाठी येथे संरक्षण भिंत बांधण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

 

 

Exit mobile version