Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खंडाळा ग्रामसेवकाची तडकाडकी बदली

भुसावळ प्रतिनिधी ।   भुसावळ तालुक्यातील खंडाळा ग्रामसेवक विजय काकरवाल यांची अचानक तडकाडकी बदली झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. तर ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद सुरवाडे यांनी ग्रामसेवकाच्या भ्रष्टाचाराची चौकशी लागणर असल्याने त्याने स्वतः बदली करून घेतली असल्याचा दावा केला आहे. 

 

काही दिवसापूर्वी २०१५  ते २०२० या कालावधीत ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप या ग्रामसेवक  विजय काकरवाल यांच्यावर आहेत. गटविकास अधिकारी विलास भटकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.  त्यांनी सांगितले की, खंडाळा ग्रामसेवक विजय काकरवाल यांची पाचोरा तालुक्यात बदली झाली असून सध्या अतिरिक्त पदभार एक ऑगस्टच्या पुढे देण्यात येईल. खंडाळा ग्रामसेवकांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे  गावात उलट सुलट  चर्चेला  उधाण आले आहे. ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद सुरवाडे यांनी  गुन्हे नोंद होतील या भीतीने ग्रामसेवकाने बदली करून घेतली असा दावा केला आहे. ते पुढे म्हणाले की, खंडाला ग्रामपंचायतीमध्ये सरपंच , उपसरपंच , ग्रामसेवक यांनी सन २०१५  ते २०  मध्ये लाखो रुपयांचा संगनमत करून भ्रष्टाचार केला आहे. व मी व आमचा राष्ट्रीय दलित पँथरचे पदाधिकारी मागील आठवड्यात  संबंधितावर गुन्हा नोंद व्हावा म्हणून धरणे आंदोलन (उपोषण)बसले होतो.   उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंधरा दिवसात चौकशी करून कार्यवाही करतो असे लेखी आश्वासन दिले असल्याने ग्रामसेवक यांनी चौकशी लागण्याच्या आतच पळ काढला आहे.  मी मागील पंचवार्षिकमध्ये झालेला भ्रष्टाचार बाहेर काढून संबंधितावर गुन्हे दाखल करून यांची जेलवारी होणार आहे.

 

Exit mobile version