Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

क्लिनिकल ट्रायल डेटा खुला करा; सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोना लसीची क्लिनिकल ट्रायल आणि लसीकरणानंतरची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे आणि उत्तर मागितले आहे.

 

लोकांना लस घेण्यास भाग पाडले जात आहे का?, असा सवालही न्यायालयाने केला आहे.  जबरदस्तीने लसीकरण करू नये किंवा लस न घेतल्याने कोणालाही नोकरी वरुन काढू नये, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले.  पुढील सुनावणी आता चार आठवड्यांनी होईल.

 

जेकब पुलीयल यांनी याचिका दाखल केली होती. लोकांना क्लिनिकल ट्रायल विषयी जाणून घेण्याचा अधिकार आहे.  लसीकरणानंतर समस्या आणि धोके काय आहेत हे देखील माहित असले पाहिजे, अशी मागणी जेकब पुलीयल यांनी याचिकेत केली होती.

 

याचिकाकर्त्याचे वकील प्रशांत भूषण म्हणाले की, लसीच्या चाचणीचा डेटा सार्वजनिक न करता इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीच्या आपत्कालीन स्थितीत वापराला मान्यता देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 

जनहित याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात दोन मागण्या करण्यात आल्या. पहिली म्हणजे कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचणीचा डेटा सार्वजनिक केला पाहिजे. दुसरे म्हणजे हे सुनिश्चित करा की कोणालाही लस घेण्यास जबरदस्तीने भाग पाडले जात नाही. या दोन्ही प्रश्नांवर केंद्र सरकारला उत्तर दाखल करावे लागेल. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, ते लसीच्या परिणामावर कोणतेही प्रश्न उपस्थित करत नाहीत. सरकारला नोटीस जारी केल्याचा अर्थ असा नाही की लसीवर शंका आहे.

 

सरकारने हा डेटा सार्वजनिक करावा, अशी मागणी जनहित याचिकेने केली आहे. हे सांगितले पाहिजे की लसीची किती लोकांवर चाचणी केली गेली आहे आणि त्याचे परिणाम काय आहेत. हे पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही? याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की, जोपर्यंत सर्व गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनात शंका कायम राहतील. सर्वोच्च न्यायालयाने यावर केंद्र सरकारकडून उत्तर मागितले आहे जेणेकरून पारदर्शकता कायम राहील. दरम्यान, न्यायालयाने स्पष्ट केले की सध्याच्या परिस्थितीत  फारसे प्रश्न उपस्थित केले जाऊ शकत नाही. आजही लोक कोरोनामुळे मरत आहेत. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी लस हे एकमेव शस्त्र आहे, असे सरकार म्हणत आहे. तरीही सरकारने आपली भूमिका घ्यावी, अशी आमची इच्छा आहे.

 

Exit mobile version