Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

क्लासेसच्या नावाखाली विद्यार्थीनीसह पालकाची १५ हजारात फसवूणक; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । क्लासेसच्या नावाखाली श्रध्दा कॉलनी येथील विद्यार्थींनी व पालकाची १५ हजारात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात क्लासेस संचालिका यांच्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, गिरीष कमलकिशोर सलामपुरीया रा. श्रध्दा कॉलनी जळगाव याची मुलगी बारावीत असल्याने तिच्यासाठी शहरातील भगीरथ हायस्कूल समोरील अगस्तस एज्यूकेशन क्लासेसमध्ये प्रत्यक्ष जावून संचालिका प्रियंका प्रजापती यांची भेट घेतली. सलामपुरीया यांनी क्लासेससाठी १५ हजार रूपये देखील रोख भरले. दरम्यान लॉकडाऊनमुळे क्लासेस जरी बंद असले तरी खासगी क्लासेसच्या संचालकांनी ऑनलाईन व ऑफलाईन अभ्यास विद्यार्थ्यांकडून घेत आले आहे. मात्र अगस्तस एज्यूकेशन क्लासेसच्या संचालकांसह इतर शिक्षकांनी कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिक्षण आत्तापर्यंत दिलेले नाही. हे पाहून सलामपुरीया यांनी दुसऱ्या खासगी क्लासेस कडून शिकवणी लावली होती. अगस्तस क्लासेसने कोणत्याही प्रकारचे मुलीला शिक्षण न दिल्यामुळे त्यांनी संचालिका प्रियंका प्रजापत यांच्याकडे भरलेली रक्कम परत मागितली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. वारंवारत पैशांचा तगादा लावल्याने संचालिका प्रियंका प्रजापत यांनी नकार दिला. तर माही प्रजापत यांनी देखील नकार देवून ‘जाबे चुतीये तेरे से जो बनता हे वो करले मेरा तु कुढ नही कर सकता’ अशी धमकी दिली. गिरीष सलामपुरीया यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात सर्व हकीकत सांगितली. गिरीष सलामपुरीया यांच्या फिर्यादीवरून अगस्तस क्लासेसच्या संचालिका प्रियंका प्रजापती व माही प्रजापती यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामानंद नगर पोलीस कर्मचारी करीत आहे.

Exit mobile version