‘क्योंकि सास भी कभी बहू’ फेम अभिनेता समीर शर्माची घरी गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई (वृत्तसंस्था) छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता समीर शर्माने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घरातील किचनच्या छताला त्याला मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. समीर ‘क्योंकि सास भी कभी बहू’, ‘कहानी घर घर की’ सारख्या मालिकांतून प्रसिद्ध झाला होता.

 

मुंबईतील मालाड पश्चिमस्थित अंहिसा मार्गावरील नेहा सीएचएस या बिल्डिंगमध्ये ४४ वर्षीय समीर वास्तव्याला होत्या. मुंबईतील मालाड परिसरात असलेल्या राहत्या घरात समीरने पंख्याला लटकून गळफास घेतला. मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वीच त्याने आत्महत्या केल्याची शंका आहे. रात्र ड्यटुीला असललेल्या सोसायटीच्या चौकीदाराने समीरला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. मृतदेहाची अवस्था पाहता समीरने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. परंतू त्याच्याजवळ कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. समीरने ‘ये रिश्तें हैं प्यार के’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कहानी घर-घर की’, ‘वो रेहने वाली महलो की’ या सारख्या १४ मालिकांमध्ये काम केले आहे. ‘हसी तो फसी’ या सिनेमातही तो झळकला होता.

Protected Content