Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कौरावांचे राज्य जाईल आणि लवकरच पांडवांचे राज्य येईल : नारायण राणे

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपसोबत युती करुन निवडून यायचे आणि संसार काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत थाटायचा, ही बेईमानी आहे. कौरवांना ज्याप्रमाणे कुठलीही नितीमत्ता नव्हती, महाविकास आघाडी सरकारलाही कुठलीच नितीमत्ता नाही. लवकरच कौरावांचे राज्य जाईल आणि लवकरच पांडवांचे राज्य येईल, अशा कडवट शब्दात नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

 

यावेळी बोलताना राणे म्हणाले, “सगळ्यांना माहिती आहे, करोनामुळे देशात व जगात हाहाकार झाला आहे. महाराष्ट्रात भयावह परिस्थिती आहे. करोनावर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात. याविषयी मुलाखतीत मार्गदर्शक केलं असतं, तर मी समजलं असतो की ही भीमटोला मुलाखत यशस्वी झाली. शरद पवारांवर जितकी टीका सामनातून झाली, तितकी कोणत्याही वर्तमानपत्रातून झाली नाही. शरद पवारांविषयी मला आदर आहे, पण सामनातील ही मुलाखत हेच राजकारण आहे,” अशी टीका राणे यांनी केली. तसेच भाजपसोबत युती करुन निवडून यायचं आणि संसार काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत थाटायचा, ही बेईमानी आहे. सामनाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी शिवसेनेमुळे भाजपचे 105 आमदार आले, असं केलेलं वक्तव्य कुणालाही पटणारे नाही, असेही नारायण राणेंनी म्हटले आहे.

Exit mobile version