Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कौटुंबिक वादातून पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची गोळ्या झाडून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । कौटूंबिक वादातून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागांतर्गत येत असलेल्या मूलचेरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकच्या जळगाव येथील माहेरवाशीण पत्नीने रायफलने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. जखमी अवस्थेत बघून मुलचेरा पोलीसांनी तातडीने चंद्रपुर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार करण्यासाठी दाखल केले असता डॉक्टरानी मृत घोषित केले.

याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील रहिवासी तर गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक धनराज बाबूलाल शिरसाठ (वय 34, मूळ राहणार मुसळी, ता. धरणगाव) हे नक्षलविरोधी अभियान राबवून पोमके मुलचेरा येथे परतले होते.धनराज हे त्यांची पत्नी संगीता वय २८ वर्षे दोन मुले  नामे भार्गर्वी वय ९ वर्षे व शुभम वय ४ वर्षे  व धनराज यांचे आई वडील यांचेसहित वास्तव्यास होते. त्यानंतर ते त्यांचे आई-वडिलांसह मौजा मूलचेरा येथे कामानिमित्त गेले होते. यावेळी त्यांची पत्नी  सौ.संगीता व दोन मुले घरीच होती. सुमारे १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान संगीता शिरसाट यांनी राहते घरात स्वतःवर  डोक्यात गोळी मारून घेतली. यावेळी  फायरिंग चा आवाज ऐकून व आईने स्वतःवर गोळी मारून घेतल्याचे पाहून भार्गवीने आरडाआरोड केल्याने पोमके येथे तैनातीस असलेले कर्मचारी व अधिकारी हे घटनास्थळी गेले असता त्यांनी संगीता यांना जखमी अवस्थेत पाहिले. यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय,चंद्रपूर येथे नेण्यात आले असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

या घटनेवरून आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून सदर घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.

Exit mobile version