Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कौटुंबिक वादातून पत्नीच्या हत्येनंतर पतीचीही आत्महत्या !

परभणी (वृत्तसंस्था) कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या पोलिस कॉन्स्टेबलने पत्नीचा धारदार शस्त्राने खून करून स्वतः देखील गळ्यावर वार करून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खानापूरात घडली आहे. कृष्णा धोंडिबा माने (वय ३०) व कमल जाधव (वय २५) अशी मयतांची नावं आहेत.

कमल जाधव ह्या येथील नानलपेठ पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होत्या. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरु होता. त्यातूनच हत्या आणि आत्महत्या झाल्याचे बोलले जात आहे. कृष्णा माने याने आधी धारदार शस्त्राने पत्नीचा गळा चिरुन खून केला. त्यानंतर स्वतःचा गळा चिरला. या घटनेत दोघेही जागीच मरण पावले. विशेष म्हणजे दोघांचे दोन वर्षापूर्वीच लग्‍न झाले होते.

Exit mobile version