Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कौटुंबिक कारणावरून पतीकडून पत्नीला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील विदगाव तुरखेडा शिवारात कौटुंबिक वादातून पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रवार १२ मे रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील विदगाव तुरखेडा शिवारात गणेश त्र्यंबक कोळेकर हे पत्नी शाहुबाई यांच्यासोबत वास्तव्याला आहे. शाहूबाई यांच्या भावाचा ११ वर्षीय मुलगा गुरूवार ११ मे रोजी  अचानक मयत झाला होता. त्यासाठी शाहूबाई या मयताच्या ठिकाणी जात असतांना पती गणेश कोळेकर याने जावू न देण्याच्या कारणावरून वाद घातला. तसेच शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत शाहूबाई या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी शाहूबाई कोळेकर यांनी शुक्रवारी १२ मे रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती गणेश त्र्यंबक कोळेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बापू कोळी करीत आहे.

Exit mobile version