Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोव्हिड वॉर्डच्या बाथरुममध्ये सलाईनच्या पाईपने गळफास, दोन बाधितांच्या आत्महत्या !!

 

 

 

नागपूर: वृत्तसंस्था ।  नागपूरमध्ये दोन वृद्ध कोरोनाबाधित रुग्णांनी आत्महत्या केल्या  81 वर्षीय रुग्णाने  कोव्हिड वॉर्डच्या बाथरूममध्ये सलाईनच्या पाईपने गळफास घेऊन आत्महत्या केली  दुसऱ्या घटनेत 68 वर्षीय वृद्धाने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली

 

. या दोन्ही घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असून आत्महत्या करणारे दोन्ही रुग्ण हे 26 मार्च रोजीच कोरोना बाधित झाले होते.

 

 

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटर मध्ये असलेल्या कोविड वॉर्डाचा बाथरूममध्ये सलाईनच्या पाईपने एका रुग्णाने स्वतःला बाथरूम मध्ये कोंडून घेतल्याची सूचना डॉक्टरांना मिळाली होती. डॉक्टरांनी हॉस्पिटल स्टाफच्या मदतीने बाथरुमचे दार तोडले असता त्या ठिकाणी 81 वर्षीय वृद्ध पुरुषोत्तम   गजभिये हे गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी सलाईन पाईपच्या मदतीने गळफास लावला होता. या घटनेची माहिती समजताच अजनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे

 

 

दुसरी घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच घडली आहे. 85 प्लॉट परिसरात राहणारे 68 वर्षीय वसंत कुटे यांनी सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 26 मार्च रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ते गृह विलगीकरणात होते. या दरम्यान त्यांना किडनी स्टोनचा त्रास वाढला होता . दोन दिवसांपासून हा त्रास असह्य होत असल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज कुंटे यांच्या कुटुंबीयांनी बांधला असल्याची माहिती अजनी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय चौधरी यांनी दिली आहे

 

नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाचा सख्या वाढत असल्याने रुग्णांना आता बेडस सुद्धा मिळणे कठीण झाले आहेत. अशा परिस्थितीत कोरोना रुग्ण आत्महत्या करत असल्याने मोठी चिंता वाढली आहे. नागपूरमध्ये सध्ये 45 हजार 322 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.

Exit mobile version