Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोविड-१९ च्या संकटातील योद्धा – खरा नायक : सिग्नल आणि टेलिकॉम तंत्रज्ञ

भुसावळ, प्रतिनिधी । जीवनावश्यक वस्तूंची वेळेवर वाहतूक सुनिश्चित करून कोविड-१९ विरूद्ध लढा देण्यासाठी भारतीय रेल्वे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. रेल्वे कर्मचारी याप्रसंगी एक उत्कृष्ट कार्य करत आहेत. या खडतर वातावरणात सिग्नल अँड टेलिकॉम (एस अॅन्ड टी) विभागाचे तंत्रज्ञ आवेशाने आणि समर्पणाने आपली कर्तव्ये पार पाडत आहेत. या कोविड-१९ च्या विरोधात जेव्हा देश संघर्ष करीत आहे तेव्हा या आव्हानात्मक वातावरणादरम्यान मालगाड्यांची वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत चालण्यासाठी सिग्नल व दूरसंचारची मालमत्ता चांगली ठेवण्यासाठी ते दररोज देखभाल करीत आहेत.

सिग्नलिंग कर्मचारी दिवसागाठी सिग्नल पोस्टची देखभाल, रिले रूम, मालवाहतूक चालविणा-या गाड्या सुरक्षित चालविण्यासाठी ट्रॅक मशीन चांगल्या स्थितीत ठेवण्याचे काम करत आहेत. तसेच, अनेक ब्लॉक्सची आवश्यकता असणारी आणि सामान्यपणे रेल्वे चालू असताना पार पाडणे अवघड असे अनेक कामे केली गेली आहेत. या लॉक डाऊन कालावधीत निरंतर वेबिनारांमुळे विविध स्तरांवर नियमित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दूरसंचार व आयटीची आवश्यकता अनेक पटींनी वाढली आहे. मेहनती आणि समर्पित टेलिकॉम कर्मचार्‍यांकडून माहितीचा अखंडित प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी समान प्रयत्न केले जात आहेत. मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागातील सिग्नल व दूरसंचारचे अधिकारी, मध्य रेल्वेचे क्षेत्रिय ( Zonal) मुख्यालय यांचे सतत सहकार्य व मार्गदर्शन घेऊन सिग्नलिंग व टेलिकॉम देखभाल कामावर बारीक लक्ष ठेवून आहेत. वरिष्ठ विभागीय सिग्नल आणि दूरसंचार अभियंता आणि त्यांच्या संबंधित प्रभागातील अन्य विभागीय अधिकारी नियमितपणे कर्मचार्‍यांना त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि या संकटकाळात त्यांना उच्च मानसिकतेत ठेवण्यासाठी नियमितपणे प्रेरणा देत आहेत. त्यांना वैयक्तिक स्वच्छता तसेच मास्क घालण्याची आणि आपली कर्तव्ये पार पाडताना सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विभागातील अभियंते कर्तव्यावर असलेल्या प्रत्येक तंत्रज्ञांना मास्क, सेनिटायझर्स, साबण आणि हातमोजे वाटप करत आहेत. दररोज कामाच्या ठिकाणी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण सुनिश्चित केले आहे. सामाजिक संपर्क टाळण्यासाठी आणि त्यांना सक्रिय व सतर्क ठेवण्यासाठी कर्मचारी रोटेशननुसार कर्तव्यावर बदलले जात आहेत. या व्यतिरिक्त कर्मचार्‍यांचे कुटुंबीय, कर्तव्यावर असलेले त्यांचे सहकारी व रेल्वे कर्मचा-यांसाठी मास्क तयार करीत आहेत. आतापर्यंत सिग्नल व दूरसंचार विभागातील कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या घरी स्वेच्छेने एकूण ९०० मास्क तयार केले आहेत आणि ४०० मास्क तयार करण्यात येत आहेत.

Exit mobile version