Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी एसओपी लागू करणार : उपमुख्यमंत्री

 

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्‍चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी तयार करुन लागू करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

 

 

औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल भगिनीच्यासंदर्भात घडलेली विनयभंगाच्या प्रयत्नाची घटना दुर्दैवी आहे. संबंधित भगिनीवर बलात्कार झालेला नाही. मात्र, विनयभंगाचा प्रयत्न होणे हे देखील वाईट कृत्य आहे. सरकारने ही संपूर्ण घटना गांभीर्याने घेतली आहे. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत करण्यात आली आहे, असं पवार म्हणाले.

 

याप्रसंगी राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्‍चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी तयार करुन लागू करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. विनयभंगाचा प्रयत्न झाल्याचा भगिनीच्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने आरोपी डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे. भगिनीचे नाव गोपनीय ठेवण्यात येत आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

Exit mobile version