Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोळगाव येथील गो.पु.पाटील विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

e3c88942 8ca0 4929 a37f 5aa7755a470dब्ब्ब्ग

 

भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कोळगाव येथील गो.पु.पाटील विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालयात आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्वच शिक्षक-शिक्षकेतर.प्राध्यापक व प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रतिमा पुजन केले. यावेळी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक अनिल पवार यांनी प्रतिमा पुजन केले. उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या महान कार्याबद्दलचा गौरव आपल्या मनोगतातून व्यक्त केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा.प्रशांत पाटील यांनी केले. तसेच आबासाहेब कोळगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर,प्राध्यापक व प्राध्यापिका आदी उपस्थित होते.

Exit mobile version