Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोल्हे हिल्स परिसरातून तरूणाचा मोबाईल लंपास

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कोल्हे हिल परिसरात असलेल्या सिद्धिविनायक चौकाजवळून तरूणाचा १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबविल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात बुधवार ३ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक चंद्रशेखर अग्रवाल (वय-२९) रा. मधुसूदन मेडिकल समोर मेनरोड रावेर जि.जळगाव हा तरूण कामाच्या निमित्ताने बुधवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता दुचाकीने शहरातील कोल्हे हिल्स परिसरात असलेल्या सिद्धिविनायक चौकाजवळ आला होता. एका सर्वजनिक ठिकाण थांबून प्रतीक अग्रवालने त्याचा मोबाईल दुचाकीवर ठेवलेला होता. त्याचे दुर्लक्ष होताच १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. प्रतीकने मोबाईलचा परिसरात सर्वत्र शोध घेतला. परंतु मोबाईल त्याला कुठेही मिळाला नाही. अखेर रात्री ८ वाजता जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन मोबाईल चोरी झाल्याची तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लीलाधर महाजन करीत आहे.

Exit mobile version