Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोर्ट चौकातील व्यावसायिकाची बॅग लांबविली; शहर पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील कोर्ट चौकसमोरील कृषक भवन येथे बेकरी असलेल्या व्यावसायिकाची बॅग लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, दौलतनगरातील रहिवासी दिनेशकुमार अर्जुनकुमार ललवाणी (वय-३२) यांची पंजाबराव कृषक भवन येथे नटखट नावाने बेकरी आहे. आज सोमवारी १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दिनेशकुमार ललवाणी हे बेकारी उघडण्यासाठी कोर्ट समोरील पंजाबराव कृषक भवन आले. त्यांनी दुचाकी पार्क करून जवळ असलेला बॉक्स व बॅग घेऊन ते दुकानाजवळ आले. बॉक्स व बॅग दुकानाच्या जवळ मोकळ्या जागी ठेऊन बँगमधून चाबी काढून दुकान उघडले.

तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती कॅटबेरी घेण्यासाठी दुकानात आला व तो कॅटबेरी घेऊन रेल्वेस्टेशनच्या दिशेने निघून गेला. दुकानातील सर्व सामान लावल्यानंतर ते बॅग घेण्यासाठी गेले असता त्यांना जागेवर बॅग दिसून आली नाही.  आजूबाजूच्या परिसरात शोध घेवूनही बॅग न मिळालने बॅग चोरी झाल्याचे लक्षात आले. ललवाणी यांनी बॅगेत १५ हजार रोख रक्कम, ६ हजाराचा मोबाईल यासह महत्वाची कागदपत्रे होती. दिनेशकुमार ललवाणी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश पाटील करीत आहे.

Exit mobile version