Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोर्टाच्या आवारातून दुचाकी लंपास; गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील न्यायालयाच्या आवारात उभी केलेली दुचाकी अज्ञात इसमाने लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगावातील मुंदखेडा येथील पोपटराव विठ्ठलराव वाबळे (वय-५५) यांनी दुचाकी (क्र. एम.एच.१९ सीबी ७५५५) शहरातील न्यायालयाच्या आवारात उभी केलेली असताना अज्ञात इसमाने लंपास केल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:१५ ते १२ वाजताच्या सुमारास घडली आहे. दरम्यान पोपटराव यांनी परिसरात शोधाशोध केली असता ३०,००० हजार रुपये किंमतीची बजाज कंपनीची मोटारसायकल मिळून आली नाही. म्हणून कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्यावर पोपटराव यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के के पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना सुभाष घोडेस्वार हे करीत आहेत.

Exit mobile version