कोर्टाच्या आदेशाशीही मोदींच्या भूमिकेची तफावत — नवाब मलिक

 

मुंबई : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना लॉकडाउन  अंतिम पर्याय असल्याचा सल्ला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कोर्टच लॉकडाउनचा आदेश देत असल्याचं सांगून मोदींची भूमिका  तफावतीची असल्याची टीका केली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशाला उद्देशून भाषण केले. त्यांनी देशातील कोरोनास्थिती, लसीकरण मोहीम आणि अन्य उपाययोजनांबाबत भाष्य केलं. ‘ दुसरी लाट मोठी असून, सरकार तिचा पूर्ण सामर्थ्याने सामना करत आहे. आव्हान मोठे असले तरी निर्धार आणि तयारीने संकटावर मात केली पाहिजे’, असे ते म्हणाले

 

आता राज्य सरकारांनी मजुरांना रोजगार आणि निर्वाहाबाबत आश्वस्त करावे, असं आवाहन मोदी यांनी केले. मोदी यांनी देशव्यापी टाळेबंदीची शक्यता फेटाळतानाच राज्यांनाही अपवादात्मक स्थितीतच टाळेबंदी लागू करण्याचा सल्ला दिला.

Protected Content