Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना :‍ जिल्ह्यात आज ५४ रूग्ण बाधित; ४४ रूग्णांची कोरोनावर मात

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यातून ५४ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहे. ४४ कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यात रूग्णांची संख्या निरंक असल्याचे दिसून आले आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-१४, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-१२, अमळनेर-०, चोपडा-१, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-४, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-१, पारोळा-५, चाळीसगाव-६, मुक्ताईनगर-६, बोदवड-१, इतर जिल्ह्यातील-३ असे एकुण ५४ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या अहवालात जिल्ह्यात एकुण ५४ हजार ६४३ रूग्ण बाधित आढळून आले आहे त्यापैकी ५२ हजार ८३० रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. तर ५११ रूग्ण कोवीड सेंटरला उपचार घेत आहे. आजच जळगाव शहर आणि भुसावळ येथील प्रत्येकी एक रूग्णांचा मृत्यू झालाय अशी माहिती जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाने प्रसिध्दपत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version