Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना ; ११ महिन्यात बेरोजगारीचं प्रमाण दुप्पट

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशातली कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. बेरोजगार होणाऱ्यांची संख्या मात्र सातत्याने वाढत आहे. लॉकडाउनमुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे बेरोजगारीच्या प्रमाणातही कमालीची वाढ झाली आहे.

 

एका खासगी संशोधन संस्थेने याबद्दलचा अभ्यास केला  या अभ्यासानुसार, या वर्षी मे महिन्यात भारतातल्या जवळपास दीड कोटींहून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यामुळे देशातल्या बेरोजगारीच्या प्रमाणात कमालीची वाढ झालेली दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात देशातलं बेरोजगारीचं प्रमाण ७.९७ टक्के होतं. मात्र या वर्षीच्या मे महिन्यामध्ये हेच प्रमाण ११.९ टक्क्यांवर पोहोचलं आहे.

 

गेल्या वर्षीच्या तुलनेत ही फार मोठी वाढ आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये हे प्रमाण १०.१८ टक्के होतं. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोजगार असणाऱ्यांपैकी शहरी भागातले जवळपास १४.७३ टक्के तर ग्रामीण भागातले १०.६३ टक्के लोक बेरोजगार झाले आहेत.

 

गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये   लॉकडाउनदरम्यान बेरोजगारीचा दर सर्वाधिक म्हणजे २३.५२ टक्के होता. मात्र पुढच्या महिन्यापासून हा दर कमी होऊ लागला. मे २०२० मध्ये देशातला बेरोजगारीचा दर २१.७३ टक्क्यांवर पोहोचला.  मे मध्ये ३७.५४५ कोटी लोकांकडे रोजगार आहे, तर एप्रिलमध्ये ३९.०७९ कोटी लोकांना रोजगार मिळाला होता. म्हणजेच मेमध्ये १.५३ कोटीहून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.

 

Exit mobile version