Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना ; सर्वाधिक रुग्णांच्या ५ राज्यामध्ये महाराष्ट्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । महाराष्ट्र देशातील १० राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येऊ लागले असून, यात दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगानं वाढ होत असून, सर्वाधिक रुग्ण आढळून येणाऱ्या पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.

 

देशात कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा वेगाने होऊ लागला आहे. लॉकडाउनच्या काळातील बंधनं शिथिल केल्यानंतर रस्त्यांवर गर्दी होऊ लागल्यानं पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे.

देशातील रुग्णसंख्येचा दैनंदिन आलेख वेगानं वाढताना दिसतोय. संसर्ग वाढला असून, अनेक राज्यांमध्ये निर्बंध लागू करण्यास सुरूवात झाली आहे.आरोग्य मंत्रालयानुसार देशातील १० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत एकूण रुग्णांपैकी ७७ टक्के रुग्ण आढळून आले आहेत. तर ७६ टक्के मृत्यूही या दहा राज्यांमध्ये झाले आहेत. यात सर्वाधिक मृत्यू दिल्लीतच झाले आहेत.

नवी रुग्णसंख्या वाढीमुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ९१ लाख ३९ हजार ८६६ इतकी झाली आहे. यात ८५ लाख ६२ हजार ६४२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ४ लाख ४३ हजार ४८६ रुग्ण उपचार घेत आहेत. देशातील एकुण मृतांचा आकडाही १ लाख ३३ हजार ७३८ वर पोहोचला आहे.

Exit mobile version