Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना संसर्ग वाढला : जिल्ह्यात ७०रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात ७० बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ५६ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आज सात तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-२५, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-१६, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-२, भडगाव-१, धरणगाव-०, यावल-४, एरंउोल-१, जामनेर-१, रावेर-६, पारोळा-०, चाळीसगाव-९, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ७० रूग्ण बाधित आढळून आले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकुण ५६ हजार ५३८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५१३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. तर ५४ हजार ६८६ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज सुदैवाने एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Exit mobile version