Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना संसर्गाचा वेग मंदावला

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशभरात आता कोरोना संसर्गाचा वेग आता मंदावला आहे . नवीन वाढणाऱ्या रुग्णांची संख्या बऱ्यापैकी कमी दिसत असल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे 

देशात भयावह परिस्थिती निर्माण करणारी कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. फेब्रवारीमध्ये देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं डोकं वर काढलं होतं. त्यानंतर रुग्णसंख्येचा विस्फोटच झाला. दुसऱ्या लाटेत जगात दैनंदिन उच्चांकी रुग्णसंख्या भारतात नोंदवली गेली. कोरोनाचा उद्रेक झाल्यानं रुग्ण आणि नातेवाईकांची उपचारासाठी प्रचंड फरफट झाली. मात्र, आता दुसरी लाटेची तीव्रता कमी होत असून, गेल्या २४ तासांतील कोरोनाची आकडेवारी दिलासा देणारी आहे.

 

देशातील कोरोना परिस्थितीबद्दलची दैनंदिन आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात येते. देशातील गेल्या २४ तासांतील आकडेवारी दिलासादायक आहे. देशात काल दिवसभरात  ९२ हजार ५९६ नवीन   रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत एक लाख ६२ हजार ६६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मृतांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत असून, गेल्या २४ तासांत देशात दोन हजार २१९ रुग्णांचा  मृत्यू झाला आहे.

 

 

 

 

 

 

राज्यात दिवसभरात  १६ हजार ५७७ रूग्ण  बरे झाले. तर, १० हजार ८९१ नवीन  बाधित आढळून आले. २९५  बाधितांच्या मृ्त्यूची नोंद झाली. राज्यात आजपर्यंत एकूण ५५,८०,९२५  बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.३५ टक्के झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.७३ टक्के इतका आहे.

 

Exit mobile version