Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना संशयित मृत व्यक्तीच्या चौकशीचा आग्रह धरण्यात येवू नये : गृह उप सचिवांचे निर्देश

जळगाव (प्रतिनिधी)  कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना संशयित मृत व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणांची पोलीस यंत्रणेकडून चौकशीचा (Inquest) आग्रह धरण्यात येत आहे. परंतू  कोरोना संशयित मृत व्यक्तीच्या चौकशीचा आग्रह धरण्यात येवू नये, असे निर्देश शासनाच्य गृह विभागाचे उप सचिव शिरीष मोहोड यांनी दिले आहेत.

 

 

सध्या असलेल्या परिस्थितीत मृत व्यक्तीच्या मृत कारणांची चौकशी (Inqest) करण्यामध्ये डॉक्टर्स, नर्स, पोलीस यांना कोरोना संसर्ग जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा मृत व्यक्तीचे चौकशी (Inquest) न करण्याची मुभा पोलीस यंत्रणेला देण्यात येत आहे. हे आदेश साथरोग नियंत्रण कायदा 1897 (Epidemic Diseases Act,१८९७) मधील भाग 2 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 (Disaster Management Act, २००५) मधील तरतुदी अन्वये राज्यामध्ये निर्बंध अस्तित्वात असे पर्यंत लागू राहतील. असे शासनाच्य गृह विभागाचे उप सचिव शिरीष मोहोड, यांनी 7 एप्रिल, 2020 च्या शासन परिपत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version