Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना संकटाचा सामना करण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले : संजय निरुपण

sanjay nirupam


मुंबई (वृत्तसंस्था)
महाराष्ट्रातले उद्धव ठाकरे सरकार कोरोना संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरले असल्याची टीका काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली आहे. निरुपण यांच्या टीकेमुळे महाविकास आघाडीत सर्व आलबेल नसल्याचे समोर आले आहे.

सरकारची कोरोनाचा सामना करण्यासाठीची तयारी अयशस्वी असल्याचे ट्विट संजय निरुपण यांनी केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मुंबईमध्ये १,१८१ आयसीयू बेड उपलब्ध आहेत. १,१६७ बेडवर कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. फक्त १ टक्के बेडच शिल्लक आहेत. मुंबईमध्ये ५३० व्हॅन्टिलेटर्स आहेत, यापैकी ४९७ व्हॅन्टिलेटर्सचा वापर सुरू आहे. फक्त ६ टक्के व्हॅन्टिलेटर्स उरले आहेत. ही तयारी मागच्या ८० दिवसात झाली आहे. अजूनही कोरोनाचा उच्चांक यायचा बाकी आहे. रुग्णांचे रिपोर्ट्स यायलाही ४-५ दिवस लागत आहेत. त्यामुळे रुग्णाची अवस्था आणखी खराब होत आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्यात आम्ही कमकुवत असल्याचे सिद्ध होत आहोत, असेही निरुपम म्हणाले.

Exit mobile version