Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : शेंदुर्णी येथे रक्तदान शिबीरात १२३ जणांनी केले रक्तदान

शेंदुर्णी प्रतिनिधी । सद्या महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असून राज्यात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. स्थितीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्या रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये म्हणून शासनाच्या आवाहनाप्रमाणे शहरात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, सध्या कोरोना आजारामुळे जगभर महामारीचे सावट आहे, सर्व भारत लॉकडाउन असताना महाराष्ट्र राज्यात रक्तपुरवठा संपत आला आहे, केवळ एक आठवडा पुरेल इतकाच रक्तपुरवठा शिल्लक आहे अशी माहिती दिली होती व सोशियल डिस्टन्स ठेऊन सद्याच्या परिस्थितीत रक्तदान करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमाला अनुसरून रक्तदान करण्याचे आवाहन केले होते या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांनी आज अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सोशियल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून स्वच्छ साबणाने हात धुवून सॅनिटायझरचा वापर करून रक्तदान केले सुरक्षित अंतर ठेवून लोक रांगेत होते प्रत्येकाने मास्क लावला होता. येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न झाले. जनतेनेही, जात, धर्म, पक्ष हा कोणताही भेदभाव न ठेवता मानवता हाच एकमेव उद्देश समोर ठेवून कोरोना ग्रस्त रुग्णांना मदत व राष्ट्रीय कार्य म्हणून आज१ एप्रिल बुधवार रोजी सकाळी ९ पासून ते दुपारी २ वाजेपर्यंत १२३ रुग्णांनी रक्तदान केले हे शिबिर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेया प्रसंगी शासकीय रक्तपेढीतर्फे डॉ.संदीप साबळे, डॉ. राहुल निकम, निलेश पवार, लक्ष्मीकांत त्रिपाठी, भरत महाले, मनीषा पाटील, प्रभाकर पाटील, बापू नेरे यांनी रक्तसंकलन कार्य केले.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड, पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वरजी कातकडे, शेंदूर्णी नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी, जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, युवक कार्याध्यक्ष सागर कुमावत, रवी गुजर, फारूक खाटीक, अमरीश गरुड, श्रीराम काटे, किशोर भावसार, प्रसन्न फासे, स्नेहदीप गरुड यांचेसह १२३ रक्त दात्यांनी या शिबिरात रक्तदान केले कार्यक्रमाच्या सुरवातीला भगवान धन्वंतरी प्रतिमेचे पूजा सागरमल जैन , सुधाकर बारी , डॉ किरण सुर्यवंशी, शांताराम गुजर , विलास पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य अधिकारी डॉ. राहुल निकम, डॉ उमेश कोल्हे , प्राचार्य डॉ वासुदेव पाटील, गरुड कनिष्ठ महा विद्यालय प्राचार्य एस.पी.उदार यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवींद्र गुजर, विलास अहिरे, फारूक खाटीक, संजय सूर्यवंशी, योगेश गुजर, धीरज जैन, प्रवीण गरुड, गजानन धनगर, गजानन बारी, प्रसन्न फासे, अजय निकम, संदीप जावळे, श्रीराम काटे, आनंदा धनगर, निलेश महाले, संजय सपकाळ, अलीम तडवी, बारकू जाधव, पंकज जैन, प्रा.दिनेश पाटील, प्रा महेश देशमुख, प्रा जीवरग, प्रा सोनवणे, प्रा. पतंगे उपप्राचार्य संजय भोळे, उपप्राचार्य आर जी पाटील, शिक्षक संजय पाटील, प्रमोद पाटील, विकास पाटील, सचिन सुर्वे यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version