Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना विषाणू मानवी त्वचेवर ९ तास जिवंत राहतो

टोकियो: वृत्तसंस्था । कोरोना संशोधनानुसार विषाणू मानवी त्वचेवर ९ तास जिवंत राहत असल्याचे आढळून आले आहे. या नव्या संशोधनामुळे कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी मदत होईल, असाही दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

जपानच्या क्योटो प्रीफेक्चरल युनिर्व्हसिटी ऑफ मेडिसीनच्या टीमने सांगितले की, विषाणू त्वचेवर किती वेळेपर्यंत राहतो, या माहितीच्या मदतीमुळे संसर्गाला अटकाव करता येणार आहे. हात सातत्याने धुणे किती आवश्यक आहे, हेदेखील या संशोधनामुळे अधोरेखीत झाले आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेशननुसार, ६० ते ९५ टक्के अल्कोहोल हॅण्डरबचा वापर अथवा २० सेकंदापर्यंत साबण आणि पाण्याने हात धुतले पाहिजे.

संशोधकांनी मानवी त्वचेवर असलेल्या विषाणूच्या स्थिरतेबाबत माहिती घेण्यासाठी मॉडेल तयार केले हा संशोधन निबंध वैद्यकीय नियतकालिकेत प्रकाशित आहे.

अभ्यासासाठी त्वचा फॉरेंसिक ऑटॉप्सीसाठी २४ तासांपूर्वी घेण्यात आली होती. निरोगी स्वयंसेवकाना बाधित करता येऊ नये यासाठी हे पाउल उचलण्यात आले. त्वचेच्या पेशींना विषाणू आणि इन्फ्लुएंजा ए विषाणू हे दोन्ही देण्यात आले. मानवाच्या संपर्कात आल्यानंतर या विषाणूंचा संसर्ग होतो. संशोधनानुसार कोविड-१९ चा संसर्ग एअरोसॉल आणि ड्रॉपलेट्समुळे होऊ शकतो, असे म्हटले जाते.

 

तापाचा विषाणू त्वचेवर १.८ तास राहतो. तर, कोरोनाचा विषाणू ९ तास त्वचेवर राहतो. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमधून नमुने घेतले त्यावेळी विषाणू ११ तासांपर्यंत त्वचेवर राहिला होता. तापाचा विषाणू १.६९ तास राहिला होता. त्याशिवाय ८० टक्के अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरमुळे कोरोनाचा विषाणू १५ सेंकदात निष्क्रिय झाला. त्यामुळे हाताची स्वच्छता राखणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

Exit mobile version