Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना विरोधात लढणार्‍या योद्ध्यांना लष्कराची मानवंदना

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनाच्या विरूध्द लढा देणार्‍यांना आज तिन्ही लष्करी दलातर्फे मानवंदना देण्यात येत असून या निमित्त देशात विविध कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला आहे.

अलीकडेच लष्कराच्या तिन्ही दलांतर्फे कोरोना विरोधात लढा देणारे डॉक्टर, आरोग्य सेवक, कर्मचारी, पोलीस, आरोग्य व सफाई कामगार आदींना मादवंदना देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. यानुसार आज भूदल, नौदल आणि हवाई दलातर्फे मानवंदना देण्यात येत आहे. याच्या अंतर्गत कोविड रूग्णालायांवर आभाळातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तसेच कोविड रूग्णालायांच्या बाहेर बँड पथकांच्या माध्यमातून मानवंदना देण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version