Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना विरोधातील लढाईत समन्वय ठेवून काम करा : खासदार रक्षा खडसे

 

रावेर, प्रतिनिधी  ।  कोरोनाचा प्रभाव वाढत आहे प्रशासनातील जबाबदार अधिका-यांनी आपसी समन्वय साधुन जनसेवा करा,  रावेर पंचायत समितीत ५० बॅडचे कोरोना हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव तात्काळ माझ्याकडे पाठवा, कोरोना सेंटरमध्ये नेहमी स्वच्छता ठेवा ही माझी जबाबदारी नाही ती माझी जबाबदारी नाही असे करत बसु नका सर्व प्रशासकिय अधिका-यांनी एकत्र येऊन कोरोना विरुध्द लढा देण्याच्या सूचना खासदार रक्षा खडसे आमदार राजूमामा भोळे यांनी कोरोना आढावा बैठकीत दिले.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता भाजपाच्या लोकप्रतिनिधीनी आज संयुक्त आढावा बैठक घेतली आली.यात वाढते पेशंट कसे कमी होणार यावर उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच येथील ग्रामीण रग्णालयात जास्तीत जास्त बेड उपलब्ध करण्याच्या सूचना तसेच व्हेंटीलेटर सुविधा देखिल तात्काळ सुरु करण्याच्या सूचना खासदार यांनी दिल्या व ऑक्सिजन सेंटरची पाहणी केली.

 

यांची होती उपस्थिती

दरम्यान बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील पंचायत समिती सभापती कविता कोळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर प स सदस्य जितु पाटील जुम्मा तडवी, तहसिलदार उषाराणी देवगुणे पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे मुख्यधिकारी रविंद्र लांडे,तालुका वैद्यकीय अधिकारी शिवराय पाटील वैद्यकीय अधिकारी डॉ एन डी महाजन सौरभ जोशी,संदीप सावळे,हरलाल कोळी, गोपाळ नेमाडे,आदी भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित,

अपघाती मयतांच्या वारसांना मदत 

किंगगाव येथे ट्रक पलटी होऊन अपघातात १५ जणांचा मृत्यु झाला होता.त्यांच्या वारसांना खासदार रक्षा खडसे आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते प्रत्येकी दोन लाखाची मदत पंतप्रधान सहायता निधीतुन चेक स्वरुपात करण्यात आली आहे.

आपसी समन्वयसाधा खासदारांची ताकिद 

कोविड सेंटर व ऑक्सिजन सेंटरवर सोयी सुविधा पुरवतांना आपसी समन्वयसाधा जबाबदारी झटकु नका अश्या शब्दात खासदार रक्षा खडसे यांनी तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना ताकिद दिली. जेवण व सोयी सुविधावर लक्ष ठेवण्याची माझी जबाबदारी नसल्याचे बैठकीत तहसीलदार म्हणाल्या होत्या.

Exit mobile version