Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना लस मोफत द्या ; ममता बॅनर्जींची मोदींकडे मागणी

 

 

कोलकाता : वृत्तसंस्था । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांचं पंतप्रधान मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. ममता बॅनर्जी यांनीही मोदींचे आभार मानले कोरोना संकटात केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून काम करतील, असा विश्वासही दिला. ममता बॅनर्जी यांनी देशातील सर्वांना कोरोना लस मोफत देण्याचीही मागणी केलीय.

 

ममता बॅनर्जी यांनी  म्हटलं आहे की, ‘शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार. पश्चिम बंगालचं हित लक्षात ठेवताना केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. मी केंद्र सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन देते  आपण एकत्र मिळून कोरोना महामारीचा सामना करु.  राज्य आणि केंद्राच्या सहकार्याचा एक आदर्श निर्माण करु’.

 

ममता बॅनर्जी यांनी सलग तिसऱ्यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी थेत राज्य सचिवालयात अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थितीबाबत बैठक घेतली.

पश्चिम बंगालची धुरा पुन्हा एकदा आपल्या हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सक्रिय झाल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसोबत  बैठक घेतली. पश्चिम बंगालमध्ये सध्यस्थितीत पूर्ण लॉकडाऊन लागणार नाही. अंशत: लॉकडाऊन लागू असेल. त्याचबरोबर लोकल ट्रेन बंद करण्याचा निर्णयही त्यांनी घेतलाय.  अन्य राज्यातून पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करायचा झाल्यास   RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं गरजेचं करण्यात आलं आहे. हे निर्णय 7 मे पासून लागू असणार आहेत.

Exit mobile version