Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना लस घेणारांना आता सरकारकडून ५ हजारांचे बक्षीस जिंकण्याची संधी

 

मुंबई : वृत्तसंस्था । कोरोना लस घेतली असेल, किंवा  घेणार असाल तर 5000 रुपयांचे बक्षीस मिळवण्याची संधी आहे. लस घेताना एक फोटो क्लिक करावा लागेल आणि तो फोटो पोस्ट केल्यानंतर तुम्हाला 5 हजार रुपयांचे बक्षीस मिळू शकेल. हे बक्षीस सरकारकडून दिलं जात आहे.

 

 

राज्यासह देशातील कोरोनाची  स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सध्या महाराष्ट्रात रोज 60 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहे. त्यामुळे कोरोनावरील लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न होतोय. सध्या देशात 45 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिली जात आहे.

 

लसीकरणाला चालना देण्यासाठी एक मोहीम राबवली जात आहे. याअंतर्गत, एखादी व्यक्ती स्वतःचा किंवा आपल्या कुटूंबाचा लस घेतल्याचा फोटो शेअर करत असेल आणि त्यासोबत त्याने एक चांगली टॅगलाइन दिली तर त्याला सरकारकडून 5000 रुपये जिंकण्याची संधी मिळू शकते.

 

 

My Gov च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याला कोरोनावरील लस दिल्यानंतर लसीकरणादरम्यानचा फोटो एका चांगल्या टॅगलाईनसह शेअर करा. या टॅगलाइनमध्ये लोकांना लसीकरणासाठी प्रेरणा द्या किंवा लसीकरणाचं महत्त्व पटवून द्या. दर महिन्याला 10 उत्कृष्ट फोटोंना (टॅगलाईनसह) प्रत्येकी 5-5 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

 

ही मोहीम 31 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. सहभागी व्हायचं असेल तर फोटो पोस्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, हा फोटो लस घेताना क्लिक करायचा आहे. ज्यामध्ये मास्क असायलाच हवा.

 

 

 

लस घ्यायची असल्यास http://cowin.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अॅडव्हान्स अपॉईंटमेंट घेऊ शकता आणि लसीकरणासाठी साइटवरही नोंदणी करू शकता. या व्यतिरिक्त आपण COWIN पोर्टल किंवा आरोग्य सेतु अ‍ॅपवर नोंदणी किंवा अपॉइंटमेंट बुक करू शकता.

Exit mobile version