Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना लसीकरण केलेल्या कुटुंबांना मिळणार मोफत धान्य

भुसावळ, प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील आर्थिक मागासवर्गीय कुटुंबियांमध्ये कोरोना लसीकरणबाबत    प्रोत्साहन मिळावे यासाठी लस घेतलेल्या कुटुंबांना ग्लोबल ह्यूमन प्रोटेक्शन  अॅण्ड  डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे धान्य वाटप करण्यात येणार आहे.  

 

छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील गरजू कुटूंब ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे, अश्या कुटुंबाना ग्लोबल ह्यूमन प्रोटेकशन एंड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या सौजन्याने ५ किलो गहू, ५ किलो तांदुळ दिले जाणार आहे. याचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन  भारतीय जनता पार्टी कायदे आघाडी शहराध्यक्ष अ‍ॅड. अभिजीत अजय मेने  यांनी केले आहे.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र,  रेशन कार्ड, आधार कार्ड अ‍ॅड.अभिजीत अजय मेने यांचे छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील संपर्क कार्यालयात जमा करावे.

 

Exit mobile version