Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : लग्नासाठी जमली गर्दी ; वधू-वर आणि आई-वडीलांसह आठ जण पोलिसांच्या ताब्यात

marreage

marreage

माजलगाव (वृत्तसंस्था) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी गर्दी होणारे सगळे कार्यक्रम रद्द करण्याच्या दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून लग्नासाठी जमलेल्या वधू-वरांसह भटजी, फोटोग्राफरसह आठ जणांना माजलगाव पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे येत्या काही दिवसात लग्न असणाऱ्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने अनेक प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. याचाच भाग म्हणून गर्दी होणारे सगळे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. मात्र, हे आदेश धुकावून माजलगाव शहरापासून १ किमी अंतर असलेल्या ब्रम्हगाव येथे दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास लग्नासाठी पाहुणे जमले असल्याची माहिती पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड पोलीस ताफा घेऊन लग्नस्थळी गेले असता, यावेळी पोलिसांना लग्नस्थळी १००- १२५ लोक जमल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी कोरोना व्हायरसच्या संसर्गाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाची माहिती दिली व जमलेल्यांना पाहुण्यांना परत जाण्यास सांगितले. मात्र, त्यानंतरही उपस्थितांनी लग्न लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी विठ्ठल पांडुरंग कांबळे (रा . ब्रम्हगाव ता . माजलगाव ( नवरीचे वडील ), मनकर्णा सुभाष पाटोळे (रा लवुळ ता. माजलगाव ( नवरदेवाची आई ), ज्ञानेश्वर उद्धव पाटोळे (रा . लवुळ (नवरदेवाचे चुलते ), चंदू महादेव आटवे (रा . लवुळ) यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Exit mobile version