Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : रोझोदा येथे रक्तदान शिबीर; ६० तरूणांनी केले रक्तदान

रावेर प्रतिनिधी । देशात संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर काही रूग्णांना रक्ताचा तुटवडा भासणार नाही, ही परिस्थिती लक्षात घेवून डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातर्फे तालुक्यातील रोझोदा येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी ६० तरूणांनी रक्तदान केले.

आपल्या महाराष्ट्र राज्यात असलेला रक्ताचा तुटवडा व कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात रक्त मिळणे शक्य होत नसल्याने आज २९ मार्च रोजी सकाळी १० वाजेपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत एकुण ६० तरूणांनी रक्तदान केले. यावेळी सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि राहुल वाघ, रोझोदा गावचे उपसरपंच दिपक धांडे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप मेढे. आदी उपस्थित राहून शिबीराचे आयोजन करणाऱ्या युवकांचे कौतुक केले. या शिबीरासाठी ललित फेगडे, गणेश महाजन, हर्षद ठाकूर, योगेश सोनवणे, हर्षल बावस्कर, महेंद्र धांडे, यशपाल धांडे, सागर चौधरी, अक्षय सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version