Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना रुग्णांसाठी कार्य हे देवाचेचं कार्य – आदिवासी विकासमंत्री ना. के.सी. पाडवी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । उल्हासदादा तुमच्याहातून फार मोठी समाजसेवा घडत आहे. एवढं उभं करणं साधी गोष्ट नाही. तुमच्याकडे युवावर्गाची टिम मोठी आहे आणि युवकचं समाजात बदल घडवू शकतात. कोरोनात नर्सिंग टिमने जे कार्य केले आहे, रुग्णांची सेवा करण्याचं जे काम डॉ.उल्हास पाटील यांच्या प्रेरणेने तुम्ही केले आहे ते देवाचेच काम असल्याचे प्रतिपादन ना.पाडवी यांनी केले.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी आज ६ रोजी जळगाव दौर्‍यावर आले असतांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट दिली. प्रवेशद्वारावर आदिवासी वेशभूषा साकारलेल्या विद्यार्थीनींनी त्यांचे औक्षण करत स्वागत केले. महाविकास आघाडी सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री झाल्यानंतर अ‍ॅड.के.सी.पाडवी यांचा हा पहिलाच जळगाव दौरा होता.

या दौर्‍यात त्यांनी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी केली. तसेच कोविड काळात डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाने दिलेल्या सेवेचा देखील त्यांनी आढावा घेतला आणि समाधान व्यक्त केले. यासोबतच अत्याधुनिक लॅब, नविन आयसीयु कक्ष, कोविड, नॉन कोविड विभागालाही त्यांनी भेट दिली. याप्रसंगी रावेरचे आमदार शिरीष चौधरी, काँग्रसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदिप पाटील, प्रदेश चिटणीस डी.जी.पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष हितेंद्र पाटील, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजस कोतवाल, डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, अशोक खलाणे, ज्योत्सनाताई विसपुते, सुलोचनाताई, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, जळगाव शहर निरीक्षक बाळासाहेब पवार, भगतसिंग बापू, माजी जिल्हाध्यक्ष राजूदादा, शरद पाटील, उमेश शिंपी, शाम तायडे, रावेरचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,किशोर, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, राजू गोसावी यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थीती होती. देवेंद्र मराठे यांनी प्रास्ताविक केले.

अ‍ॅड संदीपभैया पाटील यांनी मनोगतात जळगाव जिल्हयात कोरोना रूग्णासह इतर रूग्णांना उपचारासाठी सर्व दवाखाने बंद असतांना माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांनी कोविडसह नॉनकोविड रूग्णांसाठी दार उघडून मोठे संकट दूर केले. डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकी पाटील यांनी स्वतांचे दुख बाजूला ठेवून कोविड योध्दयासारखी सेवा केल्याने हे संकट दूर झाल्याचे सांगीतले तर आमदार शिरीष चौधरी यांनी हे रूग्णालय जिल्हावासीयांसाठी भुषणाची बाब असल्याचे सांगीतले. माजी खा. डॉ उल्हास पाटील यांनी मा. राजेशजी टोपे यांच्या मार्गदर्शनानुसार काम करतांना जळगावचे तक्तालीन व आताचे जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवल्याचा अभिमान वाटतो.

 

Exit mobile version